सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांमधल्या 89 जागांसाठी मतदान झाले. दिवसभरात 68 टक्के मतदान झाले. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5 वाजता मतदान संपले. काही ठिकाणचे आकडे यायचे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या मतदानाची टक्केवारी 2012 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी पहिल्या टप्प्यात 70.75 टक्के मतदान झाले होते.
मतदान झाले आणि 89 जागांवर उभ्या असलेल्या 977 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. मतदानाचा दुसरा टप्पा 14 डिसेंबरला आहे. मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे. कच्छ, मोरबी, जामनगर, सुरेंद्रनगर, देवभूमी, द्वारका, राजकोट, बोटाद, पोरबंदर, जुनागड, अमरेली, गिर सोमनाथ, भावनगर, भरुच, नर्मदा, सुरत, तापी, नवसारी, डांग आणि वलसाड या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. तब्बेल 2.12 कोटी मतदारांच्या या भागात सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने विजयासाठी ताकद पणाला लावली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews